Maza Times News: अजित दादा पवार गटाला लोकसभेत किती जागा मिळणार आहे ? जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला महायुतीचा …
महाराष्ट्र राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. महाराष्ट्रत देखील भाजपने शिंदे गट आणि अजित दादा पवार गट यांना जवळ करून विरोधकांना जोरदार धक्का दिला.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!असे असताना महायुतीमध्ये साध्या कोणाला किती जागा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु आता हा जागा वाटपाचा फॉर्मुला समोर आला आहे. यामध्ये शिंदे आणि अजित दादा पवार गटाला गटाला देखील जागा देण्यात आल्या आहेत.
राज्यात लोकसभेसाठी महायुतीचे जागावाटप जवळपास निश्चीत झाले आहे.
महाराष्ट्रत भाजप, अजित दादा पवार राष्ट्रवादी गट,आणि,शिंदे गट शिवसेना असे 3 गट एकत्र आल्याने जागावाटपात मोठी चढाओढ होणार हे निश्चित मानले जात होते.
भाजप-शिवसेना युतीत मागून आलेल्या अजित दादा पवार गटाला किती मिळणार? याबद्दलही चर्चा सुरु होती.
आता या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. आता भाजप २७, तर शिंदेगट आणि अजित दादा पवार गट २१ जागा लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे याची चर्चा सुरू असून या जागा कुठे आणि कोण लढवणार हे अजून समोर आले नाही.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्र फडणवीसांनी ही माहिती दिल्याचे सांगितले जात आहे. या तिन्ही पक्षांकडून याबद्दल अधिकृत माहिती लवकरच जाहीर केली जाऊ शकते. यामुळे याची जोरदार तयारी भाजपने सुरू केली असून मंत्र्यांचे दौरे देखील वाढले आहेत.याची सुरुवात सध्या बीड जिल्यात शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून आपल्याला पाहणास मिळावी आहे
दरम्यान,
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या NCP यांच्या महायुती युतीने महाराष्ट्रातील सर्व 48 लोकसभा जागांसाठी जागावाटपाचा करार जवळपास निश्चित केला आहे, असे सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले.
यासंबंधीची औपचारिक घोषणा आज केली जाण्याची अपेक्षा आहे, संभाव्यत: दिवसभर चाललेल्या चर्चेचा समारोप.
या करारानुसार भाजप २८ जागा लढवण्याची शक्यता आहे, तर शिवसेना १४ जागांवर आपले उमेदवार उभे करणार आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला पाच तर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला (आरएसपी) एक जागा देण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. जर युतीने राज ठाकरे यांच्या पक्षाला जागा देण्याचे ठरवले तर शिवसेना किंवा भाजपला एका जागेचा त्याग करावा लागेल, असे सूत्रांनी सांगितले.
शिवसेनेच्या जागा
रामटेक
बुलढाणा
यवतमाळ-वाशीम
हिंगोली
कोल्हापूर
हातकणंगले
छत्रपती संभाजीनगर
मावळ
शिर्डी
पालघर
कल्याण
ठाणे
दक्षिण मध्य मुंबई
वायव्य मुंबई
भाजपच्या जागा
नागपूर
भंडारा-गोंदिया
गडचिरोली-चिमूर
चंद्रपूर
अकोला
अमरावती
नांदेड
लातूर
सोलापूर
madha
सांगली
सातारा
नंदुरबार
जळगाव
जालना
अहमदनगर
बीड
पुणे
धुळे
दिंडोरी
भिवंडी
उत्तर मुंबई
उत्तर मध्य मुंबई
ईशान्य मुंबई
दक्षिण मुंबई
रत्नागिरी-सिंधुदुर्ग
वर्धा
रावेर
त्यापैकी 23 जागांसाठी भाजपने उमेदवार निश्चित केले आहेत, तर मुंबई उत्तर मध्य, दक्षिण मुंबई, शिर्डी, रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा या पाच जागांवर अद्याप निर्णय झालेला नाही.
राष्ट्रवादीच्या जागा
रायगड
बारामती
शिरूर
नाशिक
धाराशिव
आरएसपी जागा
परभणी
महाराष्ट्रात 19 एप्रिल२०२४, 26 एप्रिल२०२४, 7 मे, 13 मे आणि 20 मे २०२४रोजी पाच टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे.