Little Flower English Medium School Helmet Distribution
लिटिल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रिच संस्था, रोटरी क्लब ऑफ़ होरायझन आणि सेवा सहयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने हेल्मेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
Thank you for reading this post, don't forget to subscribe!
लिटिल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थी आणि पालक टूव्हिलर वरती स्कूल मध्ये ये-जा करतात अशा विद्यार्थी व पालकांसाठी लिटिल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक व श्री बालाजी सेवा प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष श्री संजयशेठ हरपळे व संस्थेच्या संस्थापक सचिव सौ सुधाताई हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली ३०० हेल्मेटचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रिच संस्था, रोटरी क्लब आणि सेवा सहयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने २५ शाळांमध्ये हेल्मेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे यामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतुक विभाग श्री व्यंकटेश देशपांडे सर, हडपसर पीआय वाहतूक विभाग, श्री उल्हास कदम साहेब, डॉक्टर सुनील मालुसरे त्याचबरोबर रोटरी क्लब पुणे फुरसुंगीचे मा श्री किरण पवार,अभिजीत खराडे,प्रदीपअण्णा हरपळे,संतोषभाऊ हरपळे, किशोरजी इनामके,संतोषजी माने तसेच रिच ट्रस्टकडून पवन भारगाव,नितीनजी पाटील,शब्बीर पुनावाला, निलिमाताई पाटील,जितेंद्र मोहन,प्रितीताई गायकवाड, सेवा सहयोग संस्थेकडून मकरंद सातभाई,ऋषिकेश डहाळे,रोहित झगडे,दिलिप काळे, याचबरोबर विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘Little Flower English Medium School Helmet distribution’
हेल्मेटचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते रिसर्च व रोटरी क्लब सेवा संयोग संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला होता विद्यार्थी व पालक गाडीवरून स्कूलमध्ये येतात आणि हीच बाब लक्षात घेऊन संस्थेचे अध्यक्ष संजय हरपळे आणि सचिव सौ सुधाताई हरपळे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आपला वानवडी परिसर आहे आणि इकडे मुंडवा भागातील जवळजवळ ५० शाळांमध्ये हा उपक्रम करणार आहोत सर्व शाळांना जे मुलं पालक टूव्हिलर वर येतात त्या पालकांना आणि पाल्यांना असा हेल्मेटच वाटप करणार आहेत. कूण ८००० हेल्मेट पालकांसाठी आणि ८००० हेल्मेट मुलांसाठी असे एकूण १६००० ची व्यवस्था या वर्षी केली आहे .
भविष्यात विविध कार्यक्रम शाळांबरोबरच ट्रॅफिक अवेअरनेस हा प्रोग्राम आता कंटिन्यू चालू करू आणि या सर्व सेवा संस्थेने आम्हाला जे सहकार्य केलं आणि शाळेनेजे सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. हडपसर भागातले सर्व, जे सामाजिक कार्य असतील त्याच्यासाठी बाकीच्या ज्या साहेब त्यांच्या मदतीने खूप चांगले चांगले मोठे कार्यक्रम राबवले जाणार आहेत आणि त्याच्यासाठी आपण समाजातल्या सर्वांनी त्याच सहभाग घ्यावा. नुस्ता पैशाचा सहभाग नसतो बाकी सहभाग बरेच असतात त्याप्रमाणे एक इच्छा आहे राहील की हडपसर भागातल्या प्रत्येकाने सामाजिक बांधिलकीसाठी काहीना-काही आपण करत राहावं देणाऱ्याचे हात कोणी धरू शकत नाही. घेणाऱ्यांचे हात कोणी धरु शकत नाही. पाहिजे तेवढे देता येतं पाहिजे तेवढे घेता येते शक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो हे आपल्याला आज दिसतंय आपली सामाजिक बांधिलकी म्हणून आपण लोकांना मदत करावी एवढं इच्छा आहे.
Little Flower English Medium School Helmet distribution
“Little Flower English Medium School Helmet distribution” लिटिल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक व श्री बालाजी सेवा प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष श्री संजयशेठ हरपळे यांच्या आपल्या शाळेतील ज्या विद्यार्थी आणि पालक टू व्हीलर वरती स्कूलमध्ये ये जा करतात अशा पालकांकरता या ठिकाणी आणि मुलांकरता हेल्मेट वाटपाचा कार्यक्रम रिच संस्था, रोटरी क्लब संस्थेच्या वतीने या सर्व मान्यवरांचे यांच्या सर्व संस्था चालकांचे त्याचप्रमाणे त्यांचे सर्व डायरेक्टर कमिटी मेंबर या सर्वांचेच मनःपूर्वक आभार व्यक्त केले आपण जो हा समाज उपयोगी आणि खऱ्या अर्थाने फक्त समाज होते की नाही तर काहीतरी समाजाला संदेश देण्याचा हा कार्यक्रम आहे. आपणही काही ट्रॅफिकचे नियम पाळले पाहिजेत समाजामध्ये आपण जे काही वागतो तर त्याच्यावरती परिवर्तन आपल्यावरती अंकुश आपण ठेवला पाहिजे.
नंतर समाजाला आपण तो बोध दिला पाहिजे या अनुषंगाने जर आपण चाललो तर निश्चितच रोडवरती होणारे अपघात कमी होतील. त्याकरता समाजामध्ये या अशा उपक्रमाची गरज आहे आणि हे उपक्रम आपण राबवल्याबद्दल संस्थेच्या वतीने तसेच सर्व संचालक कमिटीच्या वतीने आपल्या या सर्व संस्थांचे मनःपूर्वक आभार श्री संजयशेठ हरपळे यांनी व्यक्त केले व पुढील तुमच्या शुभकार्यास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या
हडपसर परिसरामध्ये कमीत कमी ४० शाळांचे त्यांनी आज नियोजन घेतलेला आहे. आणि ८००० हेल्मेट मुलांना आणि आठ हजार त्यांच्या पालकांना असा हा एवढा मोठा उपक्रम खऱ्या अर्थाने त्या दानशूर व्यक्तीचे त्यांच्याबरोबर जोडलेले आहेत त्या सर्व संस्थांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो आणि भविष्यात देखील असेच उत्तर उत्तर आपल्याकडे असे समाजसेवा घडावी अशी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो
यावेळी लिटिल फ्लॉवर इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष श्री संजयशेठ हरपळे यांच्याकडून सर्व प्रमुख पाहुण्यांचे सत्कार व सन्मान करण्यात आला.
धन्यवाद.