भविष्यात पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता आली तर !जयंत पाटील हे पुढील मुख्यमंत्री होणार?
If Pawar’s NCP comes to power in the future!! Jayant Patil will be the next Chief Minister?
Thank you for reading this post, don't forget to subscribe!Jayant Patil Sharad Pawar
शरद पवारांसोबत एखादया पोलादा प्रमाणे ठाम उभे.
भविष्यात पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता आली तर !!जयंत पाटील हे पुढील मुख्यमंत्री होणार |
सध्याच्या घडीला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवाब मलिकांच्या एन्ट्रीमुळे पुन्हा एकदा गदारोळ माजला आहे. अजित पवारांसोबत नवाब मलिक आहेत ते सत्ताधाऱ्यांच्या वाकावर जाऊन बसलेत आणि या सगळ्या घडामोडींमध्ये एकंदरीत काय तर अजित पवारांची पंचायत होते ज्या नवाब मलिकांनी सुद्धा फडणवीस यांच्या वर टोकाची टीका केली होती ,त्यांनी सुद्धा त्यांच्यासोबत जाणे पसंत केला. मग या सगळ्या घडामोडींमध्ये जयंत पाटलांचा सुद्धा राजकीय फायदा होऊ शकत होता मग ते तरी अजूनही शरद पवारांसोबत का आहेत ? एके काळच्या मंत्रिमंडळातील जवळच्या सहकार्याच्या पोरावर शरद पवारांची यांची नजर पडली.
उच्च शिक्षित व वडीलां प्रमाणे समाजकारणाची आवड असल्याचं तेव्हाच शरद पवारांनी हेरले सोबत काम करशील का? असं पवारांनी विचारतात त्यांना थोडाही विलंब न करता लगेच होकार भरला त्यावेळी कोणाला माहित होतं हाच नवतरुण चेहरा पुढील काळा शरद पवारांसोबत एखादया पोलादासारखा ठाम उभा राहून येणाऱ्या सर्व संकटांचा सामना करेल होय कारे आहे हाच चेहरा म्हुणजे जयंत पाटिल राष्ट्रवादीतील सर्वात स्वच्छ प्रतिमेचे नेते जयंत पाटील आज शरद पवार यांची सक्ख्या पुतण्यानी साथ सोडली असली तरी जयंत पाटील मात्र शरद पवारांसोबत अगदी लोह पुरुषाप्रमाणे ठामपणे उभे आहेत.’Jayant Patil will be the next Chief Minister?’
अलीकडील काळात जयंत पाटील हि अजित दादा पवार यांच्या सोबत जाणार अशा चर्चा असतानाही अगदी शांत राहून या चर्चाना फक्त चर्चा राहून दिले. आज शरद पवारांच्यादेखील जयंत पाटलांची उंची ही अजित दादां पवार यांच्या पेक्ष्या कितीतरी अधिक पटीने जास्त वाढली आहे. शांत सोजवाल व संयमी स्वभावामुळे,आताच्या विद्रूप राजकारणातही जयंत पाटील एक विश्वासू नेतृत्व म्हणून समोर येतात . राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पक्षाला 1999 ला पहिल्यांदा सत्ता मिळाली. उप मुख्यमंत्री पद सहा वजनदार खाती पवारांनी स्वतःकडे ठेवली. त्याचवेळी ४० शीत असणाऱ्या एका अमेरिका रिटर्न तरुणाकडे राज्यांचा अर्थमंत्री पद आले. राज्याचे सर्वात तरुण अर्थमंत्री ठरलेल्या याच जयंती पाटलांनी सलग दहा वर्ष अर्थसंकल्प मांडण्याचा रेकॉर्ड नावावर केला. पुढच्या दोन दशकातही प्रत्येक पातळीवर शरद पवारांचा विश्वास सार्थ ठरला.
“Jayant Patil will be the next Chief Minister?” नरेंद्र मोदी यांच्या लाटे नंतर अनेकांनी शरद पवारांची साथ सोडली असताना राष्ट्रवादीच्या पक्ष संघटन व विस्तारावर भर देणारा. अजित दादांच्या पहाटेच्या शपथविधी वेळी पवारांशी एकनिष्ट निष्ठा दाखवून देणारा आणि पवारांनी निवृत्ती जाहीर केल्यावर आल्या भावनांना वाट करून देणारा नेता ही जयंत पाटीलच राष्ट्रवादीच्या घडामोडीमध्ये केंद्रस्थानी असलेले जयंत पाटील पवारांच्या तालमीत येणं तसा योगायोगच होता. जयंतराव पाटील यांचे वडील माजी मंत्री मा राजारामबापू पाटील हे स्वतः शरद पवारांच्या मंत्रिमंडळात होते.
पवार कुटुंबाचे संबंध हे दोन पिढ्यांपासूनचे आहेत. १९७८ ला राजारामबापू पाटील हे वसंत दादा पाटलांवर नाराज होऊन काँग्रेस मधून जनता दलात गेले. पुढे वसंत दादांचं सरकार कोसळ जनता दलाच्या पाठिंबावर शरद पवार मुख्यमंत्री झाले. त्यामुळे पवारांच्या मंत्रिमंडळात राजाराम बापूंचा समावेश झाला १९८४ ला राजारामबापू पाटलांचा निधन झाल्यानंतर शरद पवार यांनी जयंत पाटलांना वडीलकीचा आधार दिला. पाटलांनी व्यक्ती केंद्रित राजकारण करत पवारांची ताकद वाढवली. २०१४ मध्ये आघाडीच्या पंधरा वर्षाच्या सत्तेला तुरुंग लागला पक्षाला घरघर लागली त्याचवेळी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी पेलवत पाटलांनी राष्ट्रवादीच्या विस्तार निर्धार परिवर्तनाचा यात्रा शिवस्वराज्य यात्रा राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या विस्तारात त्यांनी मोलाचा हातभार लावला.
पवारांनी निवृत्ती जाहीर करतात जयंत पाटलांनी आमचेही राजीनामे घ्या म्हणत भावनांना वाट मोकळी केली. पवार आणि जयंत पाटलांमध्ये भावनिक नात्याचा सर्वांना परिचय आला आहे. आता अजित पवार गट राष्ट्रवादीतून वेगळा निघाला. शरद पवारांचे अगदी विश्वासू मानले गेलेले मा श्री छगन भुजबळ व मा श्री दिलीप वळसे पाटील ही नेते मंडळी शरद पवारांना सोडून मा श्री अजित दादां पवार यांच्या सोबत गेले. असताना जयंत पाटील मात्र शरद पवार यांच्या बरोबर ठाम उभे आहेत सध्या त्यांच्या खांद्यावर पक्षाची मुख्य धुरा सोपवण्यात आली आहे
भविष्यात पवारांच्या राष्ट्रवादीची सत्ता आली तर जयंत पाटील हेच पुढील मुख्यमंत्री होणार असे ही म्हटले जाते तिकडे सारख्या पुतण्यणी साथ सोडली असताना जयंत पाटील सारखे निष्ठावंत शरद पवारांसोबत कायम आहेत. मध्यंतरीच्या कालखंडात जयंत पाटीलही शरद पवार यांची साथ सोडणार अशा अनेक अफ़वा उठवण्यात आल्या तरी जयंत पाटलांनी आपलं काम सुरूच ठेवलं.
सध्याच्यापरिस्थितीत जयंत पाटील हे शरद पवारानंतर दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे नेते आहेत.पक्षाचे निर्णय घेण्यात शरद पवार सुप्रिया सुळे देखील जयंत पाटलांना विचारल्याशिवाय पक्षातील कुठलेही निर्णय घेत नाही. जयंत पाटील पडतीच्या काळात साथ देणारे हे दीर्घकाळच्या सुखात सोबत असताता जयंत पाटलांच्या रूपाने दिसून येतात. तेव्हा आता हेच खरं या मुद्द्याबाबत तुमचं काय मत आहे हे कॉमेंट मध्ये नक्की कळवा,माझा टाइम्स न्यूज ब्लॉगर जय महाराष्ट्र
Comments are closed.